पंढरपूर क्रीडा अधिकारी दाखवा 1हजार बक्षीस मिळवा.

सहा तालुक्याला एकच क्रीडा तालुका अधिकारी

पंढरपूर क्रीडा अधिकारी दाखवा 1हजार बक्षीस मिळवा.

पंढरपूर क्रीडा अधिकारी दाखवा 1हजार बक्षीस मिळवा.

पंढरीतील क्रीडा संकुलाला वाली कोण?

 पंढरीत क्रीडा संकुल बनले जनावरांचे चारा ठिकाण वाहन पार्किंग 

पंढरपूर येथील पंढरपूर नगर परिषदेच्या जागेवर भव्य असे क्रीडा संकुल उभारले आहे परंतु क्रीडा संकुल उभारल्यापासून आज पर्यंत क्रीडा संकुलात घाणीचे साम्राज्य व दयनीय अवस्था पाहण्यास मिळत आहे . ठिकठिकाणी वॉल कंपाऊंड पडले आहे . सर जनावरांचा शेण टाकण्याचा उपयोग या जागेत केला जात आहे.पंढरपूर नगर परिषदेने काही वर्षापूर्वी ही जागा क्रीडा संकुलास दिलेली आहे. येथील क्रीडा संकुल साठी सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पंढरपूरला तालुका क्रीडा अधिकारी सत्यम जाधव यांची नेमणूक केली आहे. परंतु सत्यम जाधव क्रीडा अधिकारी यांच्याकडे सोलापूर शहरासह अक्कलकोट दक्षिण उत्तर सोलापूर बार्शी पंढरपूर या 6 ठिकाणी एकच तालुका क्रीडा अधिकारी काम पाहत आहे. त्यामुळे तालुका क्रीडा अधिकारी हे दोन ते तीन महिन्यातून एकदा पंढरपूर येथे येऊन क्रीडा विभागात आणखी दोन ते तीन तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची गरज आहे तरच हे सोलापूर जिल्ह्यातील क्रीडा संकुल व्यवस्थितपणे देखरेख करून ठेवता येतील. पंढरपूर क्रीडा संकुल या ठिकाणी दोन क्रीडा मार्गदर्शक आहेत त्यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाते परंतु हे क्रीडा मार्गदर्शक ही या क्रीडा संकुल कडे फिरकत नाहीत. त्यामुळे येथील क्रीडा संकुलला सध्या तरी वाली कोणीच नाही असे पहावयास मिळत आहे . तालुका क्रीडा अधिकारी येथील कार्यालयात कधीच हजर नसतात त्यामुळे या क्रीडा संकुल मध्ये सध्या जनावरे गाय म्हसी चरण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात या ठिकाणी माने पार्किंग केली जातात तसेच क्रीडा संकुलाच्या कार्यालयाच्या जिन्यामध्ये व्यसनाधीन दारुडे दारू पित जुगार खेळत बसतात अन्य प्रकार या ठिकाणी सुरु आहेत. येथील क्रीडा संकुलाची प्रत्यक्षात जाऊन माहिती घेऊन प्रत्यक्ष व्हिडिओ व छायाचित्रीकरण केले आहे.

 जिल्हा क्रीडा अधिकारी श्री पवार यांना आमच्या प्रतिनिधीने मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी कर्मचारी यांनी पंढरपूर येथील क्रीडा संकुलकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे क्रीडा संकुलास देण्यात आलेली नगरपरिषदेची ही जागा साधारण अडीच एकर असून या जागेमध्ये बॅडमिंटन हॉल व कार्यालय ठेवून सदरची जागा जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी नगरपरिषदेस पुन्हा परत करावी कारण या जागेवर नेहमीच पावसाळ्यात चंद्रभागेला पूर आल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रथम पुराचे पाणी येत असते त्यामुळे क्रीडा संकुल यास ही जागा अयोग्य आहे क्रीडा संकुल हे पंढरपूर शहराच्या बाहेर बाजूला नगर परिषदेच्या असणाऱ्या जागेवर नवीन क्रीडा संकुल उभा करण्यात यावे. आणि नगर परिषदेची जागा पुन्हा नगरपरिषदेने ताब्यात घ्यावी कारण या परिसरातश्री विठ्ठल मंदिर तसेच श्री विठ्ठल मंदिर दर्शन रांग, विष्णुपद मंदिर गोपाळपूर जवळ असल्याने नगरपरिषदेने या ठिकाणी आषाढी कार्तिकी पंढरपूर यात्रेला उपयोग आणता येईल असा प्रोजेक्ट या जागेवर उभा करण्यात यावा. 

क्रीडा संकुलास शहराच्या बाहेर जवळ दुसरी जागा द्यावी जेणेकरून त्या क्रीडा संकुलाचा शहरातील तरुण युवक युवती यांना त्याचा उपभोग घेता येईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उद्या सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्यावेळी या विषयाकडे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सदरच्या बैठकीमध्ये विषय घेऊन चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा. उद्या सोलापूर येथील जिल्हाधिकारी नियोजन भवन येथे विविध विषयावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबरोबर बैठक होणार असल्याने उद्या क्रीडा या विषयावरही बैठक होणार असल्याचे समजते.